

हे परंपरागत एक रुपयाचे चांदीचे एक तोळ्याचे (११.६ ग्रॅम) नाणे. या वजनाचा चांदीचा रुपया फार पुर्वीपासुन बनत आला आहे. हे नाणे व्हिक्टोरिया राणीच्या काळात बनविलेले आहे.


हे नाणे २००४ साली भारतीय डाक सेवेची १५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल काढलेले आहे. पुढील बाजूस अशोक स्तंभ व त्या खाली "एक" आकडा आहे.


एक रुपयाचे नवे स्टेनलेस स्टीलचे नाणे हे दोन रुपयाच्या नव्या नाण्याप्रमाणे काढण्यात आले आहे. या नव्या नाण्याचा आकार व वापरलेला धातु अगोदरच्या नाण्याप्रमाणेच आहे.


हे नाणे भरताचे माजी पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काढले गेले. श्री. राजीव गांधी याची १९९१ साली एका बॉंब हल्ल्यात हत्या झाली होती. या नाण्याच्या पुढील बाजुस अशोक स्तंभ व १ आकडा असून मागील बाजुस श्री.