

हे नाणे २००४ साली भारतीय डाक सेवेची १५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल काढलेले आहे. पुढील बाजूस अशोक स्तंभ व त्या खाली "एक" आकडा आहे. भारतीय नाण्यांमध्ये ही पद्धत आहे की जर मागल्या बाजूस एखाद्या खास विषयाचे चित्र द्यावयाचे असेल व त्यामुळे अशोक स्तंभ आणी आकडा एकाच बाजूस दाखवावे लागणार असतील तर ते एका खाली एक दाखवले जातात. हे नाणे त्याप्रमाणेच आहे.
मागील बाजूस १५० हा आकडा असुन इंग्रजीमध्ये "YEARS" (अर्थ: वर्षे) असे खाली लिहिले आहे. त्याआधी हिंदीमध्येही "वर्ष" असा शब्द आहे. या चित्राच्या बाजूने इंग्रजीमध्ये "INDIA POST" (अर्थ: "भारतीय डाक") व हिंदीमध्ये "भारतीय डाक" लिहीले आहे. वरील बाजूस उजव्या दिशेला भारतीय डाक सेवेचे पण्यचिन्ह व डाक तिकीटासारखी कड काढली आहे.