एक रुपयाचे स्टेनलेस स्टीलचे नवे फुलीवाले नाणे

coin_reverse:
r-001-steel-new-series-r.jpg
coin_obverse:
r-001-steel-new-series-o.jpg

एक रुपयाचे नवे स्टेनलेस स्टीलचे नाणे हे दोन रुपयाच्या नव्या नाण्याप्रमाणे काढण्यात आले आहे. या नव्या नाण्याचा आकार व वापरलेला धातु अगोदरच्या नाण्याप्रमाणेच आहे. परंतू आता नव्या नाण्यावर पुढील बाजूस अशोक स्तंभ व १ चा आकडा शेजारी आहेत. भारतीय नाण्यांच्या इतिहासात हा प्रकार नवीन आहे. आत्तापर्यंत अशोक स्तंभ व आकडा जेव्हा केव्हा एकाच बाजूस असत तेव्हा ते एकाखाली एक असत.

नाण्याच्या मागच्या बाजूस अधिकच्या खुणेप्रमाणे दिसणारी एक फुली आहे व त्या फुलीच्या चार्ही बाजूंना एक एक ठिपका आहे. ही फुली दोन रुपयांच्या अश्या नाण्यापेक्षा जरा वेगळी म्हणजे एकेरी आहे. दोन रुपयांच्या नाण्यामागे ही फुली दुहेरी रेघांची आहे.

हे नाणे खराब दर्जाचे असल्यासारखे वाटते. या प्रकारची जितकी नाणी बघायला मिळाली ती सर्व तशी नवीन असुनही खूप झिजल्याप्रमाणे दिसतात.