भारतीय नाण्यांमध्ये आपले स्वागत आहे

नमस्कार. भारतीय नाण्यांविषयीच्या या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. मी या संकेतस्थाळावर विविधतेने परिपूर्ण अशी वेगवेगळी भारतीय नाणी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ही नाणी मुख्यतः अलिकडील काळातील आहेत. येथील बहुतेक नाणी स्वतंत्र भारताची किंवा ब्रिटीश राज्याच्या काळातील आहेत. काही त्याहुनही जुनी नाणीदेखील आपल्याला पहायला मिळतील.

आपण ही नाणी वेगवेगळ्या पद्धतींनी पाहू शकता. हवी तर ती कालखंडानुसार पहा, किंवा नाण्याच्या आकारानुसार, धातूनुसार, किंवा नाण्याच्या किमतीनुसार पाहू शकता.

जर तुम्हाला हे संकेतस्थळ आवडले तर मला त्याविषयी काही पोच लिहावयास विसरू नका.

ते संकेतस्थळ मी स्वतः बांधलेले आहे आणि ही सर्व नाणीसुद्धा माझी आहेत. आपण इच्छा असल्यास माझा मराठी ब्लॉग किंवा माझा इंग्रजी ब्लॉगही पाहू शकता.

हे संकेतस्थळ अजुनही बांधले जात आहे आणि त्यामुळे त्यावर नवीन माहितीही दिली जात आहे. आपण जर येथे पुन्हा येत असाल तर आपण येथे नव्याने लिहीलेले लेख पाहू शकता.

आपला या संकेतथळावरील वेळ चांगला जावो ही सदिच्छा.

अभय घैसास.